बिडी कामगार नगर येथील रहिवासी आणि किराणा दुकान चालक 53 वर्षीय श्री. गंगाधर आहेर यांना काही मुलांनी पोटात धारधार शस्त्र मारल्याची घटना. पोटातून होणारा रक्तस्त्राव अत्यधिक आणि तो थांबता थांबेनात, एकतर लॉकडाउन आणि रविवार रात्रीची वेळ यामुळे किती लवकर आणि कुठे उपचार मिळेल यात शंका होतीच. अशा अवस्थेत काही रुग्णालयांनी उपचारास असमर्थता दाखवली. एका रुग्णालयाने शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. हे ऐकून श्री. आहेर आणि त्यांचे नातेवाईक अतिशय घाबरून गेले, कारण आधीच खूप रक्तस्त्राव झालेला आणि मोठी चीर देऊन शस्त्रक्रिया केल्याने जीवाचा धोका अधिक वाढला असता. गंगाधर आहेर सांगतात कि त्यांच्यावर असा प्रसंग आधी कधीच आलेला नव्हता आणि त्यांनी आपण जगू हि आशाच सोडून दिली होती.
वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे आल्यावर पचनसंस्थेचे शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. संदीप सबनीस यांनी आहेर यांची तपासणी केली आणि तात्काळ ऑपेरेशन थिएटरमध्ये घेतले. आहेर यांच्या मोठ्या आतड्यांना खूप मार लागलेला दिसून आला, पोटावर कसलीही मोठी चीर न देता दुर्बिणीद्वारे Key Hole/ Laparoscopy शस्त्रक्रिया करण्यात आली. रक्तस्त्राव पूर्णपणे थांबला, दुसऱ्याच दिवसापासून त्यांचा आहार सुरु करण्यात आला आणि पाचव्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. जगण्याची आशा सुडून दिलेल्या रुग्णाला अगदी पाच दिवसात ठणठणीत घरी चालत जातांना बघून त्यांचा आप्तपरिवार गहिरावून गेला. Read More
आहेर हे वेळीच हॉस्पिटलला दाखल झाल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. बहुदा रुग्णांना माहित नसते कि कुठल्या परिस्थिती कोणत्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे म्हणून गंभीर परिस्थितींमध्ये बहुदा मोलाचा वेळ वाया जातो.
डॉ. संदीप सबनीस, पचनसंस्थेचे शस्त्रक्रिया तज्ञ
वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथील केंद्रप्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह सर्व अनुभवी डॉक्टर 24 तास रूग्ण सेवेसाठी उपलब्ध असतात. सोबतच गंभीर परिस्थितीत येणार्या रुग्णांसाठी सुसज्ज अतिदक्षता विभाग, योग्य व अचूक निदान करण्यासाठी सुसज्ज रेडिओलॉजि व पॅथॉलॉजि विभाग आणि आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणारी ‘इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ कार्यान्वित आहे ज्यामुळे मोलाचा वेळ वाया जात नाही आणि लवकर उपचाराची खात्री मिळते.
Read more about laparoscopy meaning, Keyhole surgery, What is laparoscopy Here.